फैजपूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | परभणी शहरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ भारतीय संविधानाच्या कोनशीलेची तोडफोड केल्याने राज्यातील वातावरण चांगलेच तापले असून, संविधानाची विटंबना करणाऱ्यांना कडक कार्यवाहीची मागणी जोर धरू लागली आहे. एका माथेफिरू व्यक्तीने भारतीय संविधानाच्या कोनशीलेला नुकसान पोहोचवले, ज्यामुळे महाराष्ट्रात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेच्या मागे अजून काही लोकांचा हात आहे का, याचा शोध घेऊन त्यांची उच्चस्तरीत चौकशी करावी आणि अशा जातीवादी समाजकंटकांवर राष्ट्रद्रोह तसेच अनुसूचित जाती/जमाती प्रतिबंधक (अँट्रोसिटी) कायद्यानुसार कडक कार्यवाही करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
तसेच, कळमोदा, ता. रावेर येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर कळमोदा येथे मध्यरात्री कोणीतरी अज्ञान व्यक्तीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर या फलकावर शेण मारून फलकाची विटंबना केली. या दोन्ही प्रकरणांच्या निषेधार्थ आज फैजपुर विभागाचे उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी सो, यांना समस्त बौद्ध समाजाच्या वतीने निवेदन देऊन निषेध व्यक्त करण्यात आला.
निवेदन देताना भिमपुत्र ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष पप्पु मेढे, अजय मेढे, अशोक भालेराव, प्रदीप वाघ, मुकेश वाघ, भय्या वाघ, अनिल मेढे, अमर मेढे, कैलास मेढे, हर्षल मेढे, रोहित मेढे, चंद्रगुप्त मेढे, भूषण मेढे, अभिजित मेढे, गौरश वानखेडे, सागर भालेराव, शुभम कोचुरे, चेतन गाढे, जितेंद्र मेढे, किरण मेढे, रंभाबाई वाघ, अपर्णा वाघ, शांताबाई वाघ, कमलाबाई वाघ, रत्नाबाई वाघ, रेखाबाई वाघ, अमोल तायडे, नीरज मेढे, करण मेढे, सौरभ गाढे, अर्पित मेढे, चंद्रमनी मेढे, चेतन मेढे, मुन्ना मेढे, गोलू भालेराव, विशाल छरे, सलमान तडवी, पवन मेढे, देवानंद मेढे, छोटू इंगळे, बंडू तायडे, ललित थाटे, विशाल सुरवाडे यांच्यासह संविधान प्रेमी व भिम सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.