Home Cities जळगाव ब्रेकिंग न्यूज : भरधाव डंपरने दुचाकीस्वाराला उडविले !

ब्रेकिंग न्यूज : भरधाव डंपरने दुचाकीस्वाराला उडविले !

0
110

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | जळगाव शहरातील आरएल चौफुली येथे भरधाव डंपरने पुढे जाणाऱ्या दुचाकीला उडवल्याने एका तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना बुधवारी 11 डिसेंबर रोजी दुपारी 3.30 वाजता घडली आहे. यावेळी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नातेवाईकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. आसिफ हाजी शौकत कुरेशी वय 40 रा. आशा नगर, सुप्रीम कॉलनी जळगाव असे मयत झालेल्या तरुणाचे नाव आहे.

या संदर्भात अधिक माहिती अशी की, उत्तर प्रदेश येथील रहिवासी असलेले आसिफ कुरेशी हा तरुण आपल्या पत्नी व चार मुलांसह जळगाव शहरातील सुप्रीम कॉलनी परिसरातील आशानगर येथे वास्तव्याला होते. वॉल फिटिंगचे काम करून ते आपला उदरनिर्वाह करत होते. बुधवारी 11 डिसेंबर रोजी दुपारी ते गावात दुचाकी क्रमांक (एमएच 19 डीसी 1751) ने गेलेले होते. जळगाव शहरातील काम आटपून ते दुपारी 3.30 वाजता घरी जाण्यासाठी निघाले होते. त्यावेळी एमआयडीसीतील आर. एल. चौफुली येथून जात असताना त्याच्या मागून येणारे डम्पर क्रमांक (एमएच 19 सीएक्स 4940) ने मागून जोरदार धडक दिली. आसिफ कुरेशी यांचा जागेवरच मृत्यू झाला. दरम्यान ही घटना घडल्यानंतर एमआयडीसी पोलिसांनी घटना स्थळी धाव घेतली. पंचनामा करून मृतदेह जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रवाना करण्यात आला. यावेळी नातेवाईकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळाली. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. त्यांच्या पश्चात पत्नी, 3 मुली आणि 1 मुलगा असा परिवार आहे.


Protected Content

Play sound