विनया महाजन यांची अमेरिकेतील जॉर्ज मेसन युनिवर्सिटीत उच्च शिक्षणासाठी निवड

पारोळा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | पारोळा येथील सिसकॉम कॉम्प्युटर्सचे संचालक बापु महाजन व सुवर्णा महाजन यांची मुलगी विनया महाजन यांची एम. एस. (मास्टर ऑफ सायन्स) मधील कॉम्युटर सायन्स या अभ्यासक्रमासाठी निवड झाली आहे. अमेरिकेतील नामांकीत अशा जॉर्ज मेसन युनिवर्सिटीमध्ये सदरील अभ्यासक्रमासाठी निवड झालेली आहे.

विनया हिचे माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण पारोळा येथे तर बी.ई. (कॉम्युटर) पदवीचे शिक्षण गोखले एज्युकेशन सोसायटी नाशिक येथे पुर्ण झाले. सर्वसामान्य कुटुंबातील विनयाने जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर हे यश संपादन केले. तिच्या या यशात डॉ. गणेश माळी, सिमा माळी यांचे मोलाचे मार्गदर्शन तसेच नातेवाईक व मित्र मंडळी यांचे सहकार्य लाभले. या यशाबद्दल एरंडोल-पारोळा मतदार संघाचे नवनिर्वाचीत आमदार अमोल पाटील, माजी आमदार चिमणरावजी पाटील, माजी नगराध्यक्ष करण दादा पवार, माजी नगराध्यक्ष गोविंद एकनाथ शिरोळे, चंद्रकांत पाटील, मिलींद मिसर, एरंडोल गट शिक्षणाधिकारी आर. डी. महाजन, करंजी सरपंच भैय्यासाहेब रोकडे तसेच सामाजिक व राजकीय क्षेत्रातील पदाधिकारी, समस्त माळी समाज बांधव आदींनी अभिनंदन करून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या यशाबद्दल विनयाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Protected Content