रावेर तालुका मराठा समाजाच्या तालुकाध्यक्षपदी प्रा. उमाकांत महाजन

रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | रावेर तालुका मराठा समाजाच्या तालुकाध्यक्षपदी प्रा. उमाकांत पांडूरंग महाजन यांची एकमताने निवड करण्यात आली. रावेर शहरातील गौशाळा येथे झालेल्या मराठा समाजाच्या बैठकीत ही निवड करण्यात आली.प्रा महाजन यांचा मराठा समाजाच्या युवकांमध्ये मोठा प्रभाव आहे.

या बैठकीत सामुहिक विवाह सोहळा, वधू-वर परिचय मेळावा तसेच समाजातील जुन्या रूढी-परंपरांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. विशेषतः लग्नाच्या वेळा ठरवणे यावर भर देण्यात आला. या सर्व चर्चेनंतर, समाजातील बांधवांनी आपसात चर्चा करून प्रा. उमाकांत पांडूरंग महाजन यांचे नाव एकमताने पुढे करून त्यांची तालुकाध्यक्ष पदावर निवड केली.

उपाध्यक्षपदी सुरेश शिंदे, सचिवपदी मुकेश नरेंद्र पाटील तर संचालक मंडळात ईश्वर धोंडू महाजन, समाधान महाजन, विलास महाजन, पुनमचंद महाजन, राजू महाजन, रामा महाजन, विजय महाजन, देविदास महाजन, आणि मोहन महाजन यांची निवड करण्यात आली आहे.

या बैठकीत गंगाराम दाणी, लक्ष्मण महाजन, अशोक शिंदे, गोंडू महाजन, राजेश शिंदे, ॲड लक्ष्मण शिंदे, सुधाकर अप्पा, अमोल पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने सूर्यवंशी क्षेत्रिय मराठा समाजाचे बांधव उपस्थित होते. बैठकीत सामुहिक सहभाग आणि एकमताचा निर्णय घेण्यात आला, ज्यामुळे आगामी काळात समाजाच्या विविध उपक्रमांसाठी योगदान देणे शक्य होईल.

 

Protected Content