धनाजी नाना महाविद्यालयात महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन

सावदा लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल तालुक्यातील फैजपूर येथे महापरिनिर्वाण दिनानिमित्त महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण करण्यात आले. याप्रसंगी प्राचार्य डॉ. आर. बी. वाघुळदे यांच्या हस्ते मल्यार्पण करण्यात आले.

या कार्यक्रमात इतिहास विभाग प्रमुख डॉ.जगदीश खरात यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय कर्यावर टाकला तसेच त्यांच्या सामाजिक जाणिवेतून उत्पन्न राष्ट्रीय चळवळींचा अभ्यास मांडत त्यांनी लिहिलेले पुस्तक आणि समाजासाठी दिलेले योगदान याविषयी सखोल असे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार सण उत्सव समिती प्रमुख डॉ.डी. एल. सूर्यवंशी यांनी केले. प्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. हरीश नेमाडे डॉ.एस.व्ही.जाधव, डॉ. कल्पना पाटील, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी विद्यार्थिनी व समितीतील सदस्य उपस्थित होते.

Protected Content