पहिले लग्न झालेले असतानाही केले दुसरे लग्न; सात जणांवर गुन्हा दाखल

भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | पहिले लग्न झालेले असतानाही आपण घटस्फोट असल्याचे भासून भुसावळ शहरातील एका २९ महिलेशी लग्न केले. लग्नानंतर झालेला मुलगा दत्तक देण्यासाठी आग्रह करून त्या महिलेचा छळ व दागिने हडप केल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी भुसावळ तालुका पोलिस ठाण्यात सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पीडितेचा २०१५ मध्ये पहिला विवाह झालेला होता. काही कारणास्तव त्यांचा २०२० साली घटस्फोट झाला होता. त्यानंतर सचिन सैदाणे यांच्यामार्फंत त्यांचा विवाह शरद सैंदाणे यांचा सोबत २०२२ साली झाला होता. लग्नानंतर २०२३ साली पीडितेने मुलाला जन्म दिला. संशयित शरद सैंदाणे याने पहिल्या पत्नीपासून घटस्फोट घेतला नसताना देखील तसे विवाहितेला भासवून दुसरे लग्न केले. विवाहितेला झालेले मुल हे आशा सैंदाणे यांना दत्तक देण्यासाठी तिच्यावर दबाव टाकला. शिवीगाळकरून मारहाण केली आणि अंगावरील दागिने देखील काढून घेतले. विवाहितेला तिला माहेरी सोडून देत तिची फसवणूक केली म्हणून भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी संशयित शरद छगन सैंदाणे, छगन महादू सैंदाणे, अशा हर्षल सैंदाणे सर्व राहणार नांदेड ता. धरणगाव, सुनील सोनवणे, रेखा सुनील सोनवणे, मयूर सुनील सोनवणे (सर्व राहणार जामनेर), सचिन सैंदाणे राहणार नांदेड ता. धरणगाव हल्ली मुक्काम पुणे यांनी हा छळ व गुन्हा केला असल्याचे महिलेने म्हटले आहे. या प्रकरणीचा तपास पोलीस निरीक्षक महेश गायकवाड हे स्वतः करीत आहेत.

Protected Content