महायुतीच्या मंत्रीमंडळात रिपाईला मंत्रीपद द्यावे; आठवलेंची अमित शाहांकडे मागणी

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | राज्यात विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर तब्बल ११ दिवसांनी भाजपाचे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार असल्याचे आता निश्चित झाले आहे. आज भाजपाच्या नवनिर्वाचित आमदारांनी देवेंद्र फडणवीस यांची विधीमंडळ पक्षनेता म्हणून निवड केली आहे.

यानंतर देवेंद्र फडणवीस यांचे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी अभिनंदन केले. याचबरोबर महायुतीचा घटक असल्यामुळे रामदास आठवले यांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियालाही (आठवले) मंत्रिमंडळात स्थान द्यावे अशी मागणी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे केली आहे.

दिल्लीत सध्या संसदेचे अधिवेशन चलू आहे. यावेळी एएनआयशी बोलताना रामदास आठवले म्हणाले, “भाजपाच्या विधीमंडळ नेतेपदी निवड झाल्याबद्दल देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन. फडणवीस यांना मुख्यमंत्री म्हणून कामाचा मोठा अनुभव आहे. ते एक सक्रिय कार्यकर्ते आहेत. त्यामुळे ते उत्तम काम करतील. मी नुकतेच अमित शाह यांची भेट घेत त्यांना सांगितले आहे की, या निवडणुकीत महायुतीला दलितांनी मोठ्या प्रमाणात मतदान केले आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात आरपीआयलाही स्थान मिळायला हवे. अमित शाह यांनी यावर विचार करतो असा शब्द दिला आहे.

Protected Content