वरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | सालाबादप्रमाणे यावर्षीही श्री सप्तश्रृंगी मातेच्या कृपेने जय तुळजा भवानी मंदिर ते सप्तश्रृंगी गड (नाशिक) नांदुरी पालखीसह पदयात्रा मार्गशीर्ष दि. २ सोमवार रोजी सकाळी पद यात्रेचे पूजा, आरती भाग्य श्री लॉन येथे करण्यात आली. दुपारी वरणगांव येथुन निघाली या पदयात्रेत मोठ्या संख्खोने भावीक भक्तगण सहभागी झाले. यावेळी पदयात्रेच्या मार्गावर रांगोळी,पाण्याच्या सजा व फुले तसेचे फटाक्याची अतिषबाजी करून पदयात्रेचे स्वागत केले.
गावातील भजणी मंडळ, बॅन्ड पथक धारकांनी देवीचे भक्ती गीत व भजण सादर केले.गेल्या सात वर्षापासून सप्तश्रृगी गड नाशिक पदयात्रा दि २ सोमवार रोजी दुपारी पदयात्रेला सुरुवात झाली आहे.पदयात्रा दि १४ डिसेंबर रोजी सप्तश्रृंगी देवी गड नाशिक येथे पोहचून सकाळी काकडा आरती महापूजा व अभिषेक प्रभात आरती होवून महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.ही पदयात्रा भुसावळ,जळगाव,एरंडोल, धुळे,मालेगाव,कळवण,नांदुरी मार्गे संप्तश्रृगी देवी गडावर पोहणार आहे.
सप्तश्रृंगी देवी माता कार्यसमिती अध्यक्ष दिपक सोपान पाटील,उपाध्यक्ष राजाराम चौधरी, सेक्रेटरी सोपान ठोके, जॉ. सेक्रेटरी भिमा अमरसिंग पवार, कॅशियर सुरेश चौधरी, सदस्य गजानन पाटील, रामा पाटील, संदिप पाटील, भुषण पाटील, सल्लागार योगेश ठाकुर, अनमोल सहकार्य सुरेश चौधरी, सुरेश झोपे मुक्कामाचे ठिकाण सदाशिव सरस्वती महाराज गुरुदेव आश्रम सप्तश्रृंगी गड येथे मुक्काम करण्यात येणार आहे .व्यवस्थापक मधुकर श्रीपत गुळवे, सोपान मकडू ठोके,भिमा अमरसिंग पवार
वरणगांव आधी गावातील भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.