मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे साताऱ्यातील दरे गावातून ठाण्यातील निवासस्थानी रविवारी परतले असले तरी, त्यांची प्रकृती पुर्णपणे बरी झालेली नाही. यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांनी सोमवारी निवासस्थानीच विश्रांती घेतली असून यामुळे त्यांच्या सर्वच बैठका रद्द करण्यात आल्या आहेत.
राज्यात महायुतीला बहुमत मिळाले असले तरी आठ दिवस उलटूनही मुख्यमंत्री ठरू शकलेला नाही. तसेच काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीतून माघार घेतली असून शिंदे हे गृहमंत्री पदासाठी आग्रही असल्याची चर्चा आहे. एकीकडे राज्यातील सरकार स्थापनेवरून वेगवेगळ्या चर्चा रंगल्या असतानाच, दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती बिघडली आहे.