जळगाव लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | जळगाव शहरातील सागर हायस्कूल समोर झालेल्या अपघातात एका तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना २४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता घडली आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. अशोक जगन्नाथ शिंदे वय-३४, रा.
लक्ष्मी नगर, जळगाव असे मयत झालेल्या तरुणाचे नाव आहे.
या संदर्भात अधिक माहिती अशी की, अशोक जगन्नाथ शिंदे वय ३४, रा. लक्ष्मी नगर हा तरुण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. जळगाव शहरातील सागर हायस्कूल समोर २४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता अज्ञात वाहनाचा भीषण अपघात झाला. या अपघातात अशोक शिंदे हे गंभीर जखमी झाल्याने त्यांना जळगाव शहरातील ऑर्किड हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले. त्याच्यावर उपचार सुरू असताना ३० नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता त्यांच्या उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. याप्रकरणी जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल महेंद्र पाटील हे करीत आहे.