Home क्राईम मुक्ताईनगर पोलिसांची धडाकेबाज कारवाई; अडीच कोटी रुपयांचा गुटखा जप्त

मुक्ताईनगर पोलिसांची धडाकेबाज कारवाई; अडीच कोटी रुपयांचा गुटखा जप्त


मुक्ताईनगर लाईव्ह ट्रेन्स न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील पूर्णाड फाटा येथे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई करत 2 कोटी आठ लाख 82 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पकडल्याची कारवाई रविवारी एक डिसेंबर रोजी सकाळी सहा वाजता केली आहे. या कारवाईत वाहनासह मुद्देमाल पोलिसांनी जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी सायंकाळी 6 वाजता मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी की, मुक्ताईनगर तालुक्यातील पुर्णाड फाटाजवळ अवैधरित्या परराज्यातून गुटख्याची वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती मुक्ताईनगर पोलिसांना मिळाली त्यानुसार पथकाने रविवारी 1 डिसेंबर रोजी सकाळी 6 वाजता कारवाई करत पोलिसांची कारवाई केली आहे. या कारवाईत 10 चाकी ट्रकसह मोठ्या प्रमाणावरचा गुटख्याचा साठा जप्त केला आहे. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल रवींद्र पाटील मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात सक्रूरल्ला अब्दुल अजीज वय 35 रा. हरियाणा, कैफ फारुख खान वय 19 रा. राजस्थान आणि तारीख लोकमान खान व 23 रा. हरियाणा या तिघां विरोधात मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक निलेश गोसावी हे करीत आहे.


Protected Content

Play sound