एचडी कुमारस्वामी यांच्या सरकारची गच्छंती अटळ

बंगळुरू वृत्तसंस्था । कर्नाटकातील राजकीय पेचप्रसंग वाढला असतांना आता भाजपने मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांच्या राजीनाम्याची मागणी केली असून त्यांच्या सरकारची गच्छंती अटळ मानली जात आहे.

एचडी कुमारस्वामी यांचे सरकार सत्तेवरून पायउतार होणार असल्याचे आता जवळपास स्पष्ट झाले आहे. काँग्रेसने त्यांना चांगलेच पेचात पकडले असून आमदारांच्या माध्यमातून त्यांच्यावर राजीनाम्याबाबत दबाव वाढला आहे. तर दुसरीकडे भाजपनेही कुमारस्वामी यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. तर सर्व मंत्र्यांच्या राजीनाम्यामुळे कुमारस्वामी यांची गच्छंतीदेखील अटळ मानली जात आहे.

Protected Content