चोपडा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | चोपडा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांना अडावदकरांनी मतपेटीतून दिलेल्या जन आशीर्वादाचा कृतज्ञतेसाठी आज सायंकाळी आभार दौरा रॅली काढीत मतदारांचे आशीर्वाद रुपी आभार व्यक्त केले.
अडावद येथे २८ रोजी सायंकाळी पाच वाजता येथील शनी मंदिरा पासून आ. प्रा. चंद्रकांत सोनवणे यांच्या आभार रॅलीला शुभारंभ करण्यात आला यावेळी गावात ठिकठिकाणी पुष्पृष्टी ,फटाक्यांची आतषबाजी, स्वागत कमानी उभारून तसेच ढोल ताशाच्या गजरात आणि शेकडो लाडक्या बहिणीं, सुवासिनींनी औक्षण करीत नवनिर्वाचित आमदार चंद्रकांत सोनवणे यांचे स्वागत करण्यात आले.
अडवदकरांनी या निवडणुकीतही आमदार सोनवणे यांना दोन हजारापेक्षा जास्त मताधिक्य दिल्याने कार्यकर्त्यांमध्ये जल्लोष दिसून आला. यावेळी लोकेश काबरा,मंगल इंगळे, नामदेव पाटील, सचिन महाजन, हरीश पाटील ,बाळाभाऊ सोनवणे, रवींद्र देशमुख, एम. के. शेटेसर, बी.के. साळुंखे ,नवल चव्हाण, प्रभाकर महाजन, प्रकाश महाजन, जावेद खान, रामकृष्ण महाजन, नंदू पाटील, डीगंबर सुतार, डीगंबर खंबायत, बापू कोळी, संजय महाजन आदींसह महायुतीचे शेकडो कार्यकर्ते मोठ्या संख्येने आभार रॅलीत सहभागी झाले होते.