जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । बोदवड तालुक्यातील बोदवड मलकापूर, बोदवड-नशिराबाद, बोदवड-जामठी, बोदवड-शिरसाळा, रुईखेडा-शिरसाळा ते चिचखेडसिम रस्त्यावर मोठ-मोठे खड्डे पडल्यामुळे वाहन चालवताना तारेवरची कसरत करावी लागत असल्यामुळे अपघाताची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे.
एवढेच नव्हे तर शिरसाळा ते देवधाबा रस्त्याने गोराळा गावाजवळ मोठ्या मोरीचे काम नुकतेच मागच्या वर्षी झालेले आहेत. परंतु तेथे मोठ्या प्रमाणात असाऱ्या उघड्या पडल्यामुळे ते असारी टायरमध्ये घुसून अपघात होण्याची दाट शक्यता आहे. परिणामी मागच्याच वर्षी केलेला रस्ता एकाच वर्षात कसा खराब होतो. हेही विचार करणेजोगी गोष्ट आहे. एका वर्षात डांबरी रस्ते खराब होतात.पुलावरचे काँक्रेट गायब होऊन आसाऱ्या दिसू लागतात. ठिकठिकाणी खड्डे पडतात याचा अर्थ ठेकेदारांनी किती इमानदारीने ते काम केले आहे. हा त्याचा सर्वात मोठा पुरावा आहे.त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांनी याकडे काळजीपूर्वक लक्ष देऊन कामे करून घ्यावे व रस्त्याचे बिल काढताना घेतले जाणारे कमिशन कडे लक्ष न देता रस्त्याकडे लक्ष देऊन इमानदारीने काम करावे अशी मागणी जनतेकडून मोठ्या प्रमाणात केली जात आहे.