यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | यावल तालुक्यातील दहिगाव येथील राहणाऱ्या मयताच्या कुटुंबीयास स्टेट बँक शाखा सावखेडा सिम तर्फे जीवन ज्योती विमा अंतर्गत दोन लाख रुपयाचा धनादेश वितरित करण्यात आला. स्टेट बँकेने राबवण्यात आलेल्या जीवन ज्योती विमा अंतर्गत गणेश काशिनाथ पाटील याचे दिनांक १७ ऑक्टोबर रोजी अचानक आलेल्या हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले होते. त्यात त्यांनी स्टेट बँकेत आपले व्यवहार सुरू ठेवले होते. व्यवहारातून ४३६ रुपयाचा विमा जीवन ज्योती विमा हा भरण्यात आलेला होता. त्यानुसार गेल्या तीन वर्षापासून तो नियमित विमा भरत असल्याने यावर्षी सुद्धा त्याचा विमा हप्ता कापण्यात आलेला होता.
कागदपत्रांच्या पूर्ततेनुसार आणि स्टेट बँक शाखा व्यवस्थापकांच्या प्रयत्नानुसार त्याला नियमानुसार दिनांक २५ रोजी जीवन ज्योती विमा अंतर्गत दोन लाख रुपयांच धनादेश मयताच्या कुटुंबीयास त्यांच्या पत्नी हिराबाई, गणेश पाटील यांना शाखा व्यवस्थापक, रोशन कुमारझा कॅशियर, प्रवीण गुप्ता गार्ड, योगेश बारी आदी उपस्थित होते.
प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा हा वर्षाचे ४३६ रुपये तर प्रधानमंत्री विमा वर्षाचे वीस रुपये याप्रमाणे भरावयाचा आहे प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा अंतर्गत १८ ते५० वर्षापर्यंत वयोगटाची अट आहे तर प्रधानमंत्री विमा२० रुपये अन्युअल मध्ये सत्तर वर्षापर्यंतची वयोमर्यादा आहे हा विमा अपघाती आहे या योजनेचा ग्राहकांनी लाभ घ्यावा असे आवाहन शाखा व्यवस्थापक रोशन कुमार यांनी केले आहे