प्रियंका गांधी व रवींद्र चव्हाण यांनी घेतली खासदार पदाची शपथ

नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी वाड्रा आणि रवींद्र वसंतराव चव्हाण यांनी आज म्हणजेच 28 नोव्हेंबर रोजी लोकसभेत खासदार म्हणून शपथ घेतली. या वेळी दोन्ही खासदारांनी हातात राज्यघटना घेत, जय संविधान अशी घोषणाही दिली. उल्लेखनीय असेकी, रवींद्र चव्हाण यांनी खासदारकीची शपथ मराठीमध्ये घेतली. दरम्यान, पोटनिवडणुकीत दणदणीत विजय मिळवून प्रियंका गांधी वाड्रा यांनी वायनाडच्या खासदार म्हणून आपल्या कार्यकाळाला आजपासून अधिकृतपणे सुरुवात केली. संसदेच्या हिवाळी अधिवेशनात या दोन्ही सदस्यांनी शपथ घेतली.

लोकसभा निवडणूक 2024 मध्ये वायनाड आणि रायबरेली या दोन्ही मतदारसंघातून राहूल गांधी यांनी निवडणूक लढवली होती. दोन्ही ठिकाणी ते विजयी झाले होते. मात्र, त्यांना नियमानुसार कोणत्याही एकाच ठिकाणाहून लोकसभेवर प्रतिनिधित्व करता येणार असल्याने त्यांनी वायनाड येथील सदस्यत्वाचा राजीनामा दिला. या ठिकाणी ते 3,64,422 मतांच्या फरकाने विजयी झाले होते. राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या या जागेवर काँग्रेस पक्षाने राहुल यांची बहीण प्रियंका गांधी यांना उमेदवारी दिली. ज्यामध्ये त्यांनी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या सत्यन मोकेरी आणि भारतीय जनता पक्षाच्या नव्या हरिदास यांचा 4,10,931 मतांनी पराभव केला.

Protected Content