यावल आगारातुन अट्रावल मार्ग भुसावल बस सुरू; ग्रामस्थांनी मानले आभार अमोल जावळेंचे आभार

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | यावलच्या एसटी बस आगारातुन गेल्या काही वर्षापासुन यावल अट्रावल सांगवी खुर्द राजोरा मार्ग भुसावळला जाणारी बस सेवा काही कारणांनी बंद करण्यात आली होती आमदार अमोलभाऊ जावळे यांच्या प्रयत्नाने ही बससेवा पुनश्च सुरू करण्यात आल्याने या परिसरातील ग्रामस्थांमध्ये आनंद व्यक्त करण्यात येत आहे.

मागील काही वर्षापासून यावल येथील एसटी आगारातुन यावल अट्रावल सांगवी खुर्द राजोरा मार्ग जाणारी व लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या मुंजोबाचे प्रसिद्ध देवस्थान मंदिराचे गाव अट्रावल या मार्गाने जाणारी बससेवा काही कारणामुळे बंद करण्यात आली होती. ही बससेवा बंद झाल्याने संपूर्ण परिसरातील विद्यार्थीनी व विद्यार्थी यांच्यासह विविध कामानिमित्त जाणारे ग्रामस्थ शेतकरी व ग्रामस्थ यांना अनेक महत्वाच्या कामाकरीता यावल भुसावळ येथे जावे लागते त्यामुळे बससेवा ग्रामस्थांच्या दृष्टीकोणातुन फारच महत्वाची होती.

या गावातील बंद असलेली यावल आगारातील बस सेवा ही रावेर यावल विधानसभा मतदारसंघातुन मोठया मताधिक्याने विजयी झालेले भारतीय जनता पक्षाच्या महायुतीचे आमदार म्हणुन अमोल हरिभाऊ जावळे यांनी तात्काळ या परिसरातील ग्रामस्थांच्या मागणीकडे लक्ष वेधुन यावलचे आगार व्यवस्थापक दिलीप महाजन यांच्याशी संपर्क साधुन यावल आगारातुन ही बससेवा सुरु करण्यात आली या वेळी अनेक वर्षापासुन बंद असलेल्या बससेवा मुळे येणाऱ्या अडचणी दुर झाल्याने ही बससेवा पुनश्च सुरू झाल्याने आनंदीत झालेल्या परिसरातील ग्रामस्थांनी आगार प्रमुख दिलीप महाजन यांनी मागणी तात्काळ प्रतिसाद देवुन ही बससेवा पुर्वरत केल्याने आभार मानले. तसेच गावात बसचे आगमन झाल्यावर ग्रामस्थ महिलांनी एसटी बस चे पुजन करीत त्यांच्यासह बस चालक व वाहक यांच्या फुलगुच्छ देवुन सत्कार करून परिसरात राहणाऱ्या शेकडो ग्रामस्थांनी आमदार अमोलभाऊ जावळे यांचे आभार मानले आहे

Protected Content