पैशांसाठी विवाहितेचा छळ; गुन्हा दाखल

जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील गणपती नगरातील माहेर असलेल्या विवाहितेला सासरी आंबाडा ता. नेपानगर येथे माहेराहून पैसे आणावे अशी मागणी करत शिवीगाळ करत मारहाण छळ केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी मंगळवारी २६ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता रामानंद नगर पोलीस ठाण्यात पतीसह सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील गणपती नगरातील माहेर आलेल्या विवाहिता अनिता विजय राठोड वय २३ यांचा विवाह नेपानगर तालुक्यातील आंबाडा येथील विजय बाबु राठोड यांच्याशी रितीरिवाजानुसार झालेला आहे. लग्नाचे सुरूवातीचे काही दिवस चांगले गेल्यानंतर विवाहितेला माहेराहून पैसे आणावे अशी मागणी करत तिला मारहाण करून शारिरीक व मानसिक छळ केला. तसेच सासरच्या मंडळींनी देखील पैशांसाठी छळ केला. हा प्रकार सहन न झाल्याने विवाहिता माहेर निघून गेली. त्यानंतर त्यांनी रामानंद नगर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार पती विजय बाबु राठाडे, सुमदी बाबु राठोड, दगडू बाबु राठोड, अंगुरी दगडू राठोड, तापी जाधव सर्व रा. आंबाडा ता.नेपानगर, मध्यप्रदेश यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोहेकॉ अजित पाटील हे करीत आहे.

Protected Content