यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | महाराष्ट्र राज्यात महायुती नुकत्याच पार पडलेल्या विधानसभेच्या निवडणुकीत बहूमत मिळवले आहे. सत्तास्थापनेच्या घडामोडीना वेग आलेला असताना यावल येथीलभाजपा पदाधिकारी व महिलांनी देवेंद्रजी फडणवीस हे मुख्यमंत्रीपदी विराजमान व्हावेत यासाठी यावल शहरातील महर्षी व्यास मंदिरामध्ये महिला व भाजपा पदाधिकारी यांनी देवाला साकडे घातले.
यावेळी भाजपा यावल शहर महिला,पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी महाआरती केली. आमच्या लाडक्या भाऊरायाला अर्थात देवेंद्रजी फडणवीस यांनाच मुख्यमंत्री पद मिळावे अशी इच्छा व्यक्त केली. यावेळी माझ्यासह भाजपा तालुका अध्यक्ष उमेश फेगडे, किशोर कुलकर्णी, तेजस पाटील, शहराध्यक्ष राहुल बारी, अजय फेगडे, नंदाताई महाजन, भूषण फेगडे, योगेश चौधरी, बबलू घारू, अतुल चौधरी, सागर चौधरी, यांच्यासह मोठया संख्येने पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.