धोकादायक गटारीच्या चेम्बर देताय अपघातास निमंत्रण !

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जळगाव शहरातील दूध फेडरेशन परिसरातील रस्त्यावर गटारीच्या चेम्बरने खड्डयांचे स्वरूप घेतल्याने हे अपघाताला निमंत्रण देणारे आहे. या समस्येकडून प्रशासनाने पूर्णपणे दूर्लक्ष केले आहे.

याबाबत वृत्त असे की, जळगाव शहरातील दूध फेडरेशन ते गेंदालाल मील पर्यंत जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर गटारीचे चेम्बर हे धोकादायक पद्धतीने तयार करण्यात आले आहे. या मेनहोल चेम्बरची रचना रस्त्याच्या समतल करण्यात आली नसून त्यांनी खड्डयांचे स्वरूप घेतले आहे. या मेनहोल चेम्बरच्या धोकादायक रचनेमुळे रात्री एखादे भरधाव वाहन त्यांच्यावरून गेल्यास चालकाचे वाहनवरील नियंत्रण सुटण्याची दाट शक्यता आहे. या समस्येकडे प्रशासनाचे पूर्णपणे दूर्लक्ष केलेले दिसत आहे. या परिसरात मोठी लोकवस्ती असून या समस्येकडे प्रशासनाने लक्ष न दिल्यास एखादी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Protected Content