Home क्राईम भरधाव टँकरने पायी जाणाऱ्या तरूणाला उडविले

भरधाव टँकरने पायी जाणाऱ्या तरूणाला उडविले

0
106


एरंडोल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । एरंडोल शहरातील हॉटेल जत्रा समोर पायी जाणाऱ्या एका तरूणाला मागून भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रॅक्टरने जोरदार धडक दिल्याने जागीच मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी २६ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री १ वाजता घडली आहे. याप्रकरणी एरंडोल पोलीस ठाण्यात टॅकरवरील अज्ञात चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शकील नबी तांबोळी वय ३४ रा. एरंडोल नगरपालिका, समोर देशपांडे गल्ली, एरंडोल असे मयत तरूणाचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, एरंडोल शहरातील देशपांडे गल्लीत शकील नबी तांबोळी हा तरूण आपल्या परिवारासह वास्तव्याला होता. मंगळवारी २६ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री १ वाजता तो रस्त्याने पायी जात असतांना हॉटेल जत्रा समोर भरधाव वेगाने येणाऱ्या टँकरने त्यांना जोरदार धडक दिली. या धडकेत शकील तांबोळी हा गंभीर जखमी झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी सायंकाळी ७ वाजता एरंडोल पोलीस ठाण्यात टँकरवरील अज्ञात चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर पवार हे करीत आहे.


Protected Content

Play sound