भरधाव दुचाकी दुभाकावर आदळल्याने दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जळगाव तालुक्यातील नशिराबाद गावाजवळील हॉटेल भाऊच्या ढाब्याजवळ दुचाकीचा ताबा सुटल्याने भरधाव दुचाकी ही दुभाजकावर आदळल्याने दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना ११ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री अडीच वाजता घडली आहे. याप्रकरणी चौकशीअंती अखेर मंगळवारी २६ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजता नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राहूल संतोष सोनवणे रा. कोरपावली ता.यावल असे मयत झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे.

अधिक माहिती अशी की, राहूल सोनवणे हा तरूण आपल्या परिवारासह वस्तव्याला आहे. ११ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री अडीच वाजता राहूल हा दुचाकी क्रमांक (एमएच १९ ईएल ४०९७) ने जळगावकडून भुसावळकडे जात आसतांना नशिराबाद गावाजवळील हॉटेल भाऊंच्या ढाब्याजवळ त्याचा दुचाकीवरील ताबा सुटल्याने त्यांची दुचाकी दुभाजकावर आदळली. या भीषण अपघातात राहूल हा गंभीर जखमी झाल्याने त्याचा मृत्यू झाला होता. दरम्यान, या घटनेच्या चौकशी अंती अखेर मंगळवारी २६ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजता नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ प्रशांत विरणारे हे करीत आहे.

Protected Content