पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पाचोरा तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या विवाहितेला पती व मुलाला मारण्याची धमकी देत तिच्यावर जबरी अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीला आली आहे. याप्रकरणी पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबत अधिक माहिती अशी की, पाचोरा तालुक्यातील एका गावात ४५ वर्षीय महिला ही आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहे. त्याच गावात राहणारा संशयित आरोपी भैय्या उर्फ अमोल दिलीप सुर्यवंशी याने विवाहितेला पती व मुलाला मारून टाकण्याची धमकी दिली. तसेच विवाहितेला व्हिडीओ कॉल करून अश्लिल कृत्य करण्यास भाग पाडले, तसेच तिला चाकू डोक्यावर व हातावर वार दुखापत केली. दरम्यान या घटनेबाबत विवाहितेने पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाण्यात संशयित आरोपी भैय्या उर्फ अमोल दिलीप सुर्यवंशी याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस निरीक्षक अशोक पवार हे करीत आहे.