Home Cities पारोळा अमोल पाटलांनी कुटुंबियांसह बजावला मतदान

अमोल पाटलांनी कुटुंबियांसह बजावला मतदान


पारोळा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | एरंडोल-पारोळा विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे शिवसेना शिंदे गटाचे अधिकृत उमेदवार अमोलदादा चिमणआबा पाटील यांनी आज मतदानाचा हक्क बजावला. त्यांनी पारोळा शहरातील मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावला.

यावेळी त्यांचे वडील चिमणराव पाटील व कुटुंबिय उपस्थित होते. त्यांनी सर्व जनतेला मतदान करण्याचे आवाहन केले. दरम्यान पारोळा-एरंडोल मतदारसंघात दुपारी तीन वाजेपर्यंत ४१.६१ टक्के मतदान झाले असून मतदानाची प्रक्रिया सुरळीत सुरू आहे.


Protected Content

Play sound