रावेर-यावल विधानसभा मतदारसंघात ‘इतके’ मतदार बजावतील मतदानाचा हक्क

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | रावेर-यावल विधानसभा मतदार संघामध्ये उद्या होणाऱ्या मतदानासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली असून मतदानाच्या पुर्व दिनांक १९ नोव्हेंबर २०२४ रोजी मतदान प्रक्रिया अंतर्गत साहित्य वाटप बाबत सर्व कर्मचारी यांना बोलाविण्यांत आले आहे.

रावेर विधानसभा मतदार संघामध्ये एकुण ३२८ मतदान केंद्र ३२८ असुन या कर्मचारी यांची नेमणुक करण्यंत आलेली आहे. साहित्य वाटप करणेसाठी एकुण ३३ टेबल माडण्यांत आलेले आहे. मतदार संघांतील एकुण मतदार हे ३ लाख ९ हजार ३६५ असुन त्यामध्ये पुरुष १ लाख ५८ हजार४१४ व स्त्रिया मतदार१ लाख५१ हजार१२o तसेच र्टान्सजेंडर ०२ आहेत. वेब कास्टीन१७१ जागेवर करण्यांत येणार आहे. या साठी एकुण ३२ मायक्रो आब्झरवर यांची नेमणुक करण्यात आलेली आहे. रिमोट एरीया मतदान केंद्र ७ तिडया, मोहमाडली, चारमळी, गारखेडा,गारबर्डी अंधारमळी आहे.

यासाठी रनर ची व्यवस्था करण्यात आलेली आहे. कर्मचारी वाहतुक व्यवस्था ही ११३ वाहनामध्ये करण्यात आलेली आहे. त्यामध्ये क्रुझर ६४, स्कुलबस १३ एस.टी. बस ३६ अंशी आहे. सदर मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडली जावी यासाठी साहित्य वाटप व साहित्य जमा करणेसाठी तसेच स्ट्रॉग रूम करीता त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्था ठेवण्यांत आलेली आहे. निवडणुक निरिक्षक अरूण कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली रावेर विधानसभा मतदारसंघात उद्या होणाऱ्या निवडणुकीच्या मतदाना साठी १४९० कर्मचारी १६ पोलीस अधिकारी व ४२५ पोलीस कर्मचारीसह प्रशासकीय यत्रंणा ही पुर्णपणे सज्ज झाली आहे

Protected Content