अवैध लाकडाने भरलेला आयशर जप्त; यावल वनविभागाची कारवाई

रावेर-मोरगाव खुर्द रस्त्याने आज १८ नोव्हेंबर सोमवार रोजी शासकीय वाहनाने गस्त करीत असताना टाटा कंपनीचे वाहन क्रमांक (MH-o4-CU- 5418) मध्ये अवैध लाकूड भरलेले दिसून आले. सदर प्रकरणाची चौकशी केली असता वाहनचालकाकडे लाकूड वाहतूक परवाना मिळून आला नाही. यावरून वनगुन्हा घडल्याचे निदर्शनास आल्याने मुद्देमालासह वाहन पुढील चौकशी साठी ताब्यात घेऊन शासकीय मुख्य अगार डेपो रावेर येथे आणून जमा केला. 1) निम जळावू लाकूड =15.500 घ.मी. मालाची किंमत=21500, 2) टाटा आयशर कंपनीचे मालवाहू वाहन क्रमांक. MH04-CU- 5418 बाजारभावानुसार अंदाजित किंमत=230000.

सदर गुन्हे प्रकरणात ऐकुन=251500रू. किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या गुन्हे प्रकरणी भारतीय वन अधिनियम 1927 नुसार POR NO.03/2024 मध्ये कलम 41(2)ब, 42, 52 अन्वये गुन्हा नोंदविला आहे. गुन्ह्याची पुढील चौकशी वनपाल (आहिरवाडी) करीत आहेत.सदर कार्यवाही ही नीनू सोमराज वनसंरक्षक धुळे (प्रा ),मा. श्री.जमीर शेख उपवनसंरक्षक यावल वनविभाग जळगाव, समाधान पाटील सहाय्यक वन संरक्षक प्रादेशिक व कॅम्पा यावल, यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या कार्यवाहीत वनपरिक्षेत्र अधिकारी रावेर , श्री. अजय बावणे सर, वनरक्षक सूपडू सपकाळे, जगदीश जगदाळे , थावऱ्या बरेला,कियारसिंग बारेला , आकाश बारेला, निलेश बारेला ,वाहन चालक विनोद पाटील यांनी सहभाग घेतला.

Protected Content