यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | यावल तालुक्यातील रावेर विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या व चोपडा विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या गावांमध्ये वोटर स्लिप वाटपाचे कार्यक्रम हे प्रगतीपथावर सुरू असून घरोघरी जावुन त्या त्या परिसरात नेमणुकीला असलेले बिएलओंच्या माध्यमातुन मतदारांना वोटर स्लिप वाटप करण्यात येत आहे. रावेर आणि चोपडा विधानसभा मतदारसंघाच्या क्षेत्राअंतर्गत येणाऱ्या यावल तालुक्यांच्या गावांमध्ये जवळपास ७० टक्के मतदारांना वोटर स्लिप बीएलओ यांनी वितरीत करण्यात आल्या आहेत. या वोटर स्लिप वितरीत करण्यात आलेल्या कार्यक्रमाचा आढावा स्वतः रावेर विधानसभा मतदारसंघाचे निरीक्षक अरुण कुमार यांनी घेतला. प्रत्येक मतदारांपर्यंत पोहोचून कशा पद्धतीने वोटर स्लिप वितरीत केली जात आहे.
यावेळी मतदार संघातील वोटर स्लिप वाटप कार्यक्रमाची प्रत्यक्ष पाहणी करीत निवडणुकीचे निरिक्षक अरुण कुमार यांनी या कार्यक्रमात सहभागी झालेल्या बिएलओ यांच्याकडून माहीती घेत त्यांच्या अडचणी संदर्भात माहीती घेत समस्यांचे निराकरण केले सविस्तर माहिती त्यांनी जाणून घेतली. यावल तालुका हा रावेर आणि चोपडा या दोघ ही विधानसभेच्या मतदारसंघात विभागला गेला असुन यात रावेर विधानसभा मतदारसंघात यावल तालुक्यातील २०४ मतदान केंद्र असुन,चोपडा विधानसभा मतदारसंघात एकूण ७४ मतदान केंद्र आहेत या दोन्ही मतदारसंघातील मतदान केंद्रावरील सर्व मतदारांना बीएलओच्या माध्यमातून वोटर स्लिप वितरीत केली जात आहे.
मागील आठवड्यापासून हा कार्यक्रम सुरू असुन घरोघरी जाऊन मतदारांची पडताळणी करून बीएलओ हे मतदान चिठ्ठी मतदारांना पहोचवत आहेत. दरम्यान तहसीलदार मोहनमाला नाझीरकर,निवासी नायब तहसीलदार संतोष विनंते यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या या कारवाईचा आढावा विधानसभा मतदारसंघातील निरीक्षक अरुण कुमार यांनी घेतला. बीएलओ यांना वोटर स्लिप वितरण माहिती जाणून घेतली. व संपूर्ण मतदारसंघात मतदारांपर्यंत वोटर स्लिप पोहचवुन त्यांचा मतदान केंद्रा बाबतची माहिती देवुन आपणास कशा पद्धतीने त्यांना मतदान केन्द्रापर्यंत जाता येईल तसेच मतदान करण्यासाठी मतदारांनी सोबत कोण कोण कोणते पुरावे घेवुन जायचे आहेत या संदर्भातील माहिती प्रत्येक बीएलओने मतदारांना द्यावी अशा प्रकारच्या सूचना निरीक्षक अरुण कुमार बिएलओ यांना मार्गदर्शन करतांना केल्यात.