जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | गोदावरी फाउंडेशन संचलीत गोदावरी इन्स्टिट्युट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च जळगाव महाविद्यालयात पंडित नेहरू यांच्या प्रतिमेला महाविद्यालयाचे संचालक डॉ. प्रशांत वारके यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले..
स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांची आज १४ नोव्हेंबर रोजी १३४ वी जयंती आहे. बालदिनाच्या माध्यमातून संपूर्ण देश नेहरूंचे स्मरण करत आहे. याप्रसंगी डॉ. प्रशांत वारके यांनी मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, भारताचे पहिले पंतप्रधान स्व. पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती बाल दिन म्हणून साजरी केली जाते. का
रण त्यांना बालकांविषयी अतूट प्रेम होते. त्यांचे – भारत्ताच्या राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक विकासात अत्यंत महत्त्वपूर्ण योगदान होते आज आपण त्यांच्या कार्याची माहिती घेऊन त्याप्रमाणे कृती करण्याची प्रतिज्ञा घेतल्यास हीच खरी त्यांना भावपूर्ण आदरांजली असेल असेही ते म्हणाले. सदर कार्यक्रमाप्रसंगी महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.