ब्रेकींग न्यूज : चरित्र्याच्या संशयावरून पत्नीचा गळा आवळून खून; पतीला अटक

पाचोरा लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । चरित्र्यांच्य संशयावरून निर्दयी पतीने पत्नीचा रूमालाने गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी १५ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री १ वाजता घडली आहे. या गुन्ह्यातील पतीला अटक करण्यात आली असून पाचोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाय्या उर्फ भैय्या शंकर चव्हाण वय ५८ रा. गोराडखेडा ता.पाचोरा मु.रा.कुसम्या ता.निवाली जि.बडवाणी मध्यप्रदेश असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, मध्यप्रदेशातील कुसम्या येथील रहिवाशी असलेल्या सैय्यादीबाई भाया उर्फ भैय्या चव्हाण वय ५२ ह्या महिला आपले पती भाया उर्फ भैय्या चव्हाण यांच्या सोबत पाचोरा तालुक्यातील गोराडखेडा येथे वास्तव्याला होत्या. दरम्यान तिचे पती भाया उर्फ भैय्या चव्हाण हा तिच्यावर नेहमी चरित्र्याचा संशय घेत होता, त्यावरून त्यांचे नेहमी भांडण होत होते. दरम्यान शुक्रवारी १५ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री १ वाजता पत्नी झोपलेली असतांना त्याने पत्नीच्या गळ्यात रूमाल आवळून तिचा खून केला. ही घटना उघडकीला आल्यानंतर पाचोरा पोलीस अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल होवून पंचनामा केला. त्यानंतर शेतकरी चंद्रकांत काशिनाथ पाटील वय ३२ रा. गोराडखेडा ता.पाचोरा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी भाया उर्फ भैय्या चव्हाण याच्या विरोधात पाचोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आले. पुढील तपास पोलीस निरीक्षक अशोक पवार हे करीत आहे.

Protected Content