जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान जनजागृती उपक्रम बहिणाबाई विद्यालय येथे स्वीप नोडल अधिकारी तथा सहा आयुक्त मा. अश्विनी गायकवाड मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आला. विद्यार्थ्यांची मानवी साखळी व सुंदर अशा रांगोळीच्या माध्यमातून मतदानाची टक्केवारी वाढावी याकरिता ” प्रत्येक मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावावा ” हा संदेश देत उत्सव निवडणुकीचा या मतदान साक्षरता अभियानाच्या माध्यमातून बहिणाबाई माध्यमिक विद्यालयात विविध कार्यक्रमाचे आयोजन मुख्याध्यापक डॉ. विलास नारखेडे यांनी अत्यंत प्रभावीपणे राबविला.
सुंदर रंगीत रांगोळीच्या माध्यमातून विविध परिणामकारक असे संदेश देत तसेच मी मतदान करणारच असा संकल्प करून विविध घोषणा देत विद्यार्थी आणि शिक्षकांनी मानवी साखळीच्या साह्याने प्रभावी रित्या जनजागृती अभियानचे आयोजनात साक्षी शिरसाळे,योगेश निवतकर, हर्षाली अस्वार,कुणाल जगताप,शिव कुमावत, राम महाजन, अवनी मोरे,आयुष तडवी,मोहित सूर्यवंशी,ललित महाजन इ.विद्यार्थ्यांनी आई,बाबा,ताई, मावशी दादा तसेच शेजारी,पाजारी यांना संकल्प पत्र देऊन मतदानाचे आवाहन करण्यात आले . यात उत्स्फूर्तपणे मुख्याध्यापक डॉ. विलास नारखेडे,राजेश वाणी,संतोष पाटील,दिनेश चौधरी,संतोष सोनार,दुर्गादास कोल्हे,स्वाती कोल्हे,सीमा चौधरी,डॉक्टर प्रतिभा राणे आणि वैशाली पाटील इत्यादींनी आगामी निवडणुकीत मतदान टक्का वाढवण्याचा अभिनव असा संदेश दिला.