विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर साकेगावात पोलीसांचा रूट मार्च

साकेगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शनिवारी ९ नोव्हेंबर रोजी सकाळी ७ वाजता भुसावळ तालुक्यातील साकेगावात भुसावळ तालुका पोलीस ठाण्याच्या वतीने रूट मार्च काढण्यात आला. यावेळी सीआरपीएफ कंपनीचे दोन अधिकारी, २५ अंमलदार तसेच भुसावळ तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी रूट मार्चमध्ये सहभाग नोंदविला होता.

राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. ही निवडणूक शांततेत पार पडावी, या अनुषंगाने संबंधित पोलीस ठाण्याच्या अंतर्गत वेगवेगळ्या गावांमध्ये रूट मार्च करण्यात येत आहे. या अनुषंगाने भुसावळ तालुक्यातील साकेगाव येथे भुसावळ तालुका पोलीस ठाण्याच्या अंतर्गत शनिवारी ९ नोव्हेंबर रोजी सकाळी ७ वाजता रूट मार्च काढण्यात आला. यावेळी रूट मार्चमध्ये सीआरपीएफ कंपनीचे २ अधिकारी तसेच २५ अंमलदार, भुसावळ तालुका पोलीस ठाण्याचे २ पोलीस अधिकारी, १० पोलीस अंमलदार यांनी रूट मार्चमध्ये सहभाग नोंदविला होता. यावेळी हा रूट साकेगावातील बसस्थानकापासून सुरुवात होऊन पवार गल्ली, भवानीनगर, पोळा मैदान, पटेल गल्ली आणि परत बसस्थानक असा काढण्यात आला.

Protected Content