अमेरिकन राष्ट्रध्यक्ष निवडणूकीत डोनाल्ड ट्रम्प यांचा विजय निश्चित

वाशिंग्टन डी.सी-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | अमेरिकन राष्ट्रध्यक्षाच्या निवडणूकीत रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी जवळपास विजय निश्चित केला असून त्यांना २७ राज्यामध्ये आघाडी मिळाली आहे. आता केवळ ७ राज्यात मतमोजणी बाकी असून २७० या बहुमताच्या आकड्याजवळ ट्रम्प पोहचले असून त्यांन २६७ जागा जिंकल्या आहे.

आतापर्यंत ४३ राज्याचे निकाल लागले आहे. यातील ५३८ जागांपैकी २६७ जागा ट्रम्प तर कमला यांना २१४ जागा मिळाल्या आहेत. उर्वरित ७ राज्यांमध्ये ट्रम्प आघाडीवर आहे. त्यामुळे कमला निवडणूक हरण्याच्या मार्गावर असून ट्रम्‍प हे दुसऱ्यादा अमेरिकन राष्ट्रध्यक्ष होणार आहे.

कमला यांचा पराभव अमेरिकेतील स्विंग राज्यामुळे झाला आहे. या स्विंग राज्यात ट्रम्प आतापर्यंत २ जिंकले असून ५ मध्ये आघाडी घेतली आहे. स्विंग राज्ये ही अशी राज्ये आहेत जिथे दोन पक्षांमधील मतांचे अंतर खूपच कमी आहे. हे कोणत्याही मार्गाने जाऊ शकतात. या राज्यांमध्ये ९३ जागा आहेत.

Protected Content