झाडाला गळफास घेवून प्रेमी युगुलाची आत्महत्त्या

hangging

चोपडा प्रतिनिधी । नात्याने मेव्हणा व साली असलेल्या प्रेमी युगुलाने शेतातील झाडाला दोर बांधून एकाच दोराने आत्महत्या केल्याची घटना सकाळी 11 वाजेच्या सुमारास उघडकीस आली असून याबाबत चोपडा ग्रामीण पोलीसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील वाळकी येथे मध्ये प्रदेशातील आदिवासी कुटुंब उदरनिर्वाहासाठी गेल्या १०/१५ वर्षापासुन असलेले अनिल सरदार बारेला (३०) रा. देवली दुगाणी ता. वरला जिल्हा बडवानी व चिंगी मुरला बारेला (१९) रा, रोजानीमाल ता.वरला जिल्हा बडवानी या दोन्ही प्रेमीयुगलांचे मृतदेह आज सकाळी ११वाजेचा सुमारास शालिक नवल पाटील यांचा शेताचा बांधावर बोराचा झाडावर गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले. ते निम्माहिस्साने शेती हा व्यवसाय करीत होते. दोघेही कुटुंब वाळकी गावात शेजारीच राहत होते.

घरात दोघांना होता विरोध
दोघेही एकाच समाजाचे असल्यामुळे व नातेवाईकच होते. दोघांचे एकमेकांच्या घरी येणेजाणे होते. नात्याने सख्खे साली व मेहुणे असलेले ते दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. परंतु दोघांच्या घरी हा विषय समजल्याने विरोध होवु लागला होता. दोघांनी आत्महत्या केल्याची माहिती वाळकी येथील पोलीस पाटील अर्जुन पाटील यांनी चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनला दिली असून याबाबत आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

घटनास्थळी पोलीसांची धाव
घटनास्थळी पोनि भिमराव नंदुरकर, सहाय्यक फोजदार नामदेव महाजन, पोहेकाँ सुनिल जाधव यांनी स्थानिक नागरीकांच्या मदतीने प्रेमी युगलांचा मृतदेह झाडावरुन खाली उतरवून ताब्यात घेऊन चोपडा उपजिल्हा रुग्णालयात आणुन शवविच्छेदन डॉ. शरद पाटील यांनी असुन केले. पुढील तपास पो.नी नंदुरकर यांच्या आदेशान्वये स.फौ.नामदेव महाजन करीत आहे.

Protected Content