मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | कोल्हापुरात महायुतीतर्फे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज प्रचाराचा नारळ फोडला. यावेळी शिंदेनी महायुतीचा दहा कलमी जाहीरनामा सादर केला. यावेळी एकनाथ शिंदे यांनी मोठी घोषणा करत लाडक्या बहिणींना महिन्याला १५०० ऐवजी २१०० रूपये देण्याचे जाहीर केले. त्यांनी सादर केले १० कलम पुढीलप्रमाणे आहे.
१. लाडक्या बहिणींना २१०० रुपये देण्याचे जाहीर करत आहोत. महिला सुरक्षेसाठी २५००० हजार महिलांना पोलिस दलात भरती करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे.
२. शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्राच्या तिजोरीवर पहिला हक्क शेतकऱ्याचा आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर करत आहोत तसेच शेतकरी सन्मान योजना जी आहे पंतप्रधानांची त्याचे 6000 आणि आपले 6000, एकूण 12 हजार जी आहे, ती १२ हजार वर्षाला 15 हजार करण्याचा निर्णय घेतला आहे. एमएसपीवर 20 टक्के अनुदान देण्याचा देखील निर्णय घेण्यात आला आहे
३. या राज्यात कोणीही उपाशी झोपणार नाही. प्रत्येकाला अन्न आणि निवारा देण्याचे वचन आम्ही देत आहोत.
४. वृद्ध पेन्शनदार कामना योजना १५०० वरून २१०० रुपये देण्याचे वचन आम्ही देत आहोत.
५. जीवनावश्यक वस्तूंच्या किमती स्थिर ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.
६. 25 लाख रोजगार निर्मिती, १० लाख विद्यार्थ्यांना विद्यावेतन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
७. ४५ हजार गावात पांदण रस्ते बांधणार
८. अंगणवाडी आणि आशा सेविकांना १५ हजार रुपये आणि विमा सुरक्षाकवच देण्याचा निर्णय घेतला आहे.
९. वीजबिलात ३० टक्के कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यात सौर आणि अक्षय उर्जेवर भर देणार आहोत.
१०. व्हीजन महाराष्ट्र २०२९ हे १०० दिवसांच्या आत सादर करण्याचे वचन या १० कलमी कार्यक्रमात आहे.