मुंबई प्रतिनिधी । कर्नाटकातील सरकार अस्थिर करण्यासाठी भाजपकडून सरकारी यंत्रणांचा गैरवापर केला जात असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केला आहे.
आज काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी भाजपवर जोरदार टीका केली. ते म्हणाले की, कर्नाटकमध्ये लोकशाही पद्धतीने निवडून आलेले काँग्रेस व धर्मनिरपेक्ष जनता दलाचे सरकार पाडण्यासाठी भाजपाकडून सातत्याने प्रयत्न सुरू आहे. यासाठी केंद्र सरकार व इतर भाजपशासीत राज्यातील यंत्रणांचा सर्रास गैरवापर सुरू आहे, भाजपाकडून लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम सुरू आहे. गोवा, मणिपूर, अरुणाचल प्रदेश आणि बिहार या राज्यांमध्येदेखील हीच नीती वापरून भाजपने सत्ता मिळवली. आता पश्चिम बंगाल व कर्नाटक मध्ये तेच करण्याचा भाजपचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोपदेखील चव्हाण यांनी केला. ही लोकशाहीची विटंबना असून यामुळे लोकशाही धोक्यात आल्याचेही ते म्हणाले.