Home क्राईम गटारीच्या साफसफाईवरून दोन्ही भावांना बेदम मारहाण

गटारीच्या साफसफाईवरून दोन्ही भावांना बेदम मारहाण

0
100

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील सुप्रीम कॉलनी परिसरामध्ये गटार साफ करण्याच्या कारणावरून दोन भावांना शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करून गंभीर दुखापत केल्याची घटना रविवारी ३ नोव्हेंबर रोजी सकाळी ११.३० वाजता घडली आहे. याप्रकरणी दुपारी ३ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात ४ जणांना विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

यासंदर्भात अधिक माहिती अशी की, मोहम्मद युनूस गुलाम मुस्तफा वय-४८, रा. सुप्रीम कॉलनी जळगाव हा तरुण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. रविवारी ३ नोव्हेंबर रोजी सकाळी ११.३० वाजता गटार साफ करण्याच्या कारणावरून मोहम्मद युनूस गुलाम मुस्तफा आणि त्याच्या भाऊ मोहम्मद हिसाब गुलाम मुस्तफा या दोघांना गल्लीत राहणारे मुस्ताक गुलाम काकर, मोहसनी काकर, गोलू काकर आणि अशपाक काकर यांनी शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करत जीवेठार मारण्याची धमकी दिली. दरम्यान या प्रकरणी दुपारी ३ वाजता मोहम्मद युनूस गुलाम मुस्ताफा याने दिलेल्या फिर्यादीवरून मारहाण करणाऱ्या चौघांविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक पंकज पाटील हे करत आहे.


Protected Content

Play sound