जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शेअर मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावर लाभ मिळणार असल्याचे सांगून निवृत्ती नगरातील एका तरूणाची तब्बल ४३ लाख २२ हजार ६५३ रूपयांची ऑनलाईन फसवणूक केल्याची धक्कादायक प्रकार २८ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजता उघडकीला आले आहे.शहरे
याप्रकरणी बुधवारी ३० ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेसात वाजता जळगाव सायबर पोलीस ठाण्यात अज्ञात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील निवृत्ती नगरात राहणाऱ्या एका तरूणाला ३ सप्टेंबर ते २८ ऑक्टोबर दरम्यान त्यांना व्हॉटसॲप वरून अनन्या वर्मा आणि पुनीत भाटीया असे नावे सांगणाऱ्या दोन जणांनी पवार यांच्याशी संपर्क साधला. त्यावेळी त्यांनी शेअर मार्केटमधील आयपीओ मध्ये पैसे गुंतवल्यास मोठ्या प्रमाणावर फायदा होईल असे सांगून त्यांच्याकडून वेळोवेळी ऑनलाईन पध्दतीने ४३ लाख २२ हजार ६५३ रूपयांची फसवणूक केली.
आपली फसवणूक झाल्याचे समोर आल्यानंतर पवार यांनी जळगाव येथील सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून जळगाव सायबर पोलीस ठाण्यात अनन्या वर्मा आणि पुनीत भाटीया अशी नावे सांगणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक निलेश गायकवाड हे करीत आहे.