खुन्नस देत दोघांवर कोयत्याने वार; दगड टाकून दोन्ही दुचाकींचे केले नुकसान

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । वाघ नगर दुचाकी आडवून धारदार कोयत्याने वार केल्याने दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. तर दोन दुचाकींवर दगड टाकून तोडफोड करून नुकसान केल्याची घटना मंगळवारी २९ ऑक्टोबर रोजी रात्री १० वाजता घडली आहे. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, अजय सुरेश लोखंडे वय २१ रा. समता नगर, जळगाव हा तरूण मंगळवारी २९ ऑक्टोबर रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास पवन शशीराव हरवळे, चेतन सिताराम तायडे, शुभम भिमराव सोनवणे सर्व रा. समतानगर यांच्या सोबत वाघनगर येथे दुचाकीने येत होते. त्यावेळी त्यांचा ओळखीचा शुभम उर्फ मनी अहिरे, ईश्‍वर अहिरे आणि इतर दोन अनोळखी यांनी अजय लोखंडे व त्यांच्या मित्रांचा रस्ता आडविला. त्यानंतर शिवीगाळ करत लोखंडी कोयत्याने अजय लोखंडे आणि चेतन तायडे यांच्या पायाला आणि पाठीला गंभीर दुखापत केली. त्यानंतर टोळक्याने दोन्ही दुचाकींची तोडफोड करण्यास सुरुवात केली. यावेळी काही जणांनी तेथील दगड उचलून दुचाकीवर टाकून त्यांचे नुकसान केले. यामध्ये (एमएच १९, बीडी ८६२४) व (एूएच १९, ईडी ८८७९) क्रमांकाच्या दुचाकींची नुकसान झाले.

दरम्यान ही घटना घडल्यानंतर रामानंदनगर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली. दोन्ही वाहने रामानंदनगर पोलीस ठाण्यात जप्त करण्यात आले. याप्रकरणी अजय लोखंडे याने दिलेल्या फिर्यादीवरून शुभम उर्फ मनी अहिरे, ईश्‍वर अहिरे आणि इतर दोन अनोळखी यांच्या विरोधात रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस कॉन्स्टेबल प्रशांत पाटील हे करीत आहे.

Protected Content