पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | येथे विधानसभा निवडणुकीत अर्ज भरण्यासाठी एख मिनिट उरला असतांना असे काही घडले की, यामुळे मतदारसंघात मोठी खळबळ उडाली आहे.
पाचोरा मतदार संघाच्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी २९ ऑक्टोबर रोजी नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी मोठ्या घडामोडी घडल्या असुन श्रीमती वैशाली किरण सुर्यवंशी व अमोल शांताराम शिंदे या दोन्ही उमेदवारांनी आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्याने काही काळ प्रांताधिकारी कार्यालय आवारात तणावाचे वातावरण होते.
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक – २०२४ च्या पार्श्वभुमीवर प्रसिध्द केलेल्या नामनिर्देशन वाटप व दाखल करण्याच्या २९ ऑक्टोबर हा आजचा शेवटचा दिवस होता. सदर नियोजित वेळापत्रकानुसार १८ – पाचोरा विधानसभा मतदार संघ अंतर्गत् २९ रोजी अखेर एकत्रित ४२ संभाव्य उमेदवाराच्या प्रतिनिधींना १०९ नामनिर्देशन पत्राचे वाटप हे निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी पाचोरा यांच्या बैठक सभागृहातुन करण्यात आलेले आहे. वाटप केलेल्या नामनिर्देशना पैकी २९ रोजी १५ उमेदवारांनी १७ नामनिर्देशन पत्र निवडणूक निर्णय अधिकारी १८ – पाचोरा विधानसभा मतदार संघ यांचेकडे दाखल केलेले आहे.
नामनिर्देशन पत्र वाटप व दाखल सुरु झाल्यापासून आजतायागत एकुण २५ उमेदवारांनी ३९ नामनिर्देशन पत्र दाखल केलेले आहे. नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी १५ उमेदवारांनी १७ नामनिर्देशन पत्र दाखल केले आहेत. शेवटच्या दिवशी नामनिर्देशन पत्र दाखल करणाऱ्यांमध्ये निळकंठ नरहर पाटील (अपक्ष), विजय नरहर पाटील (अपक्ष), प्रताप हरी पाटील (महाराष्ट्र स्वराज्य पक्ष), नरेंद्रसिंग मुख्यारसिंग सुर्यवंशी (अपक्ष), मांगो पुंडलिक पगारे (बहुजन महापार्टी), मनोज आप्पा ससाणे (अपक्ष), संदिप फकिरा जाधव (अपक्ष), हरिभाऊ तुकाराम पाटील (अपक्ष), श्रीमती वैशाली किरण सुर्यवंशी (अपक्ष), शाबीर खान शब्बीर खान (अपक्ष), सतिष अर्जुन बिऱ्हाडे (बहुजन समाज पार्टी), सचिन अशोक सोमवंशी (अपक्ष व भारतीय राष्ट्रीय काँग्रेस), सुरेश पांडुरंग पाटील (हिंदुस्थान जनता पार्टी), अमित मानखाॅं तडवी (वंचित बहुजन आघाडी), अशोक शांताराम शिंदे या १५ जणांनी १७ उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
दरम्यान, शेवटच्या क्षणाला वैशाली सुर्यवंशी व अमोल शिंदे यांच्या नावाशी साधर्म्य असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज दाखल केल्यामुळे याचीच एकच चर्चा सुरू झाली आहे. तर सोशल मीडियातही यावरून वातावरण तापले आहे.