जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तांबापुरा येथे कारवरील नियंत्रण सुटून कार दुभाजकावर आदळून झालेल्या अपघातात कारमधी चौघे गंभीर जखमी झाले. ही घटना शनिवारी २६ ऑक्टोंबर रोजी पहाटे तीन वाजेच्या सुमारासदरम्यान घडली. याप्रकरणी सोमवारी २८ ऑक्टोबर रोजी एमआयडीसी पोलीस ठाण्यात कारचालक विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील बळीराम पेठेत फरिद मुशिर खान हा तरुण वास्तव्यास आहे. जळगाव तालुक्यातील पाथरी येथे राहत असलेली त्याची आत्या मेहरु निसा नुर्जा पठाण (रा. पाथरी, ता. जळगाव) यांची तब्येत खराब असल्यामुळे शनिवारी २६ ऑक्टोंबर रोजी फरिद मुशिर खान व त्याचा भाऊ आरिफ, तोशिफ आणि त्यांचा मित्र साहिल अजीज शहा व रऊफ शहा हे (एमएच ०२, बीटी ८३९२) क्रमांकाच्या कारने जात होते. पहाटे ३ वाजेच्या सुमारास ते ईच्छादेवीकडून तांबापूराकडे जात असतांना कार चालविणाऱ्या रऊफ शहा याचे गाडीवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे गाडी ही दुभाजकावर जावून आदळली.
या अपघातात फरिद खान याच्या हाताला, साहील याच्या पायाला तर उर्वरीत दोघांना मुक्कामार लागून ते जखमी झाले. तसेच कारचा पुढील भागाचा चुराडा होवून नुकसान झाले. परिसरातील नागरिकांनी जखमींना तात्काळ उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले. उपचार घेतल्यानंतर फरिद खान याने एमआयडीसी पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार कार चालक आरिफ मुशिर खान याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ रामदास कुंभार हे करीत आहे.