धरणगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । धरणगाव शहरातील हनुमान नगरात लोखंडी तलवार घेऊन दहशत निर्माण करणाऱ्या एका तरुणावर धरणगाव पोलिसांनी कारवाई करत मंगळवारी २९ ऑक्टोबर रोजी सकाळी ७ वाजता अटक केली आहे. त्याच्याकडून अडीच हजार रुपये किंमतीची लोखंडी तलवार जप्त केली आहे. याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
या संदर्भात मिळालेली माहिती अशी की धरणगाव शहरातील हनुमान नगरात संशयित आरोपी समाधान गजानन माळी उर्फ वाघ वय-३० रा. हनुमान नगर धरणगाव हा तरुण बेकायदेशीररित्या हातात लोखंडी तलवार घेऊन दहशत माजवीत असल्याची गोपनीय माहिती धरणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पवन देसले यांना मिळाली त्यानुसार त्यांनी पथकाला कारवाई करण्याच्या सूचना दिल्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक संतोष पवार, पोलीस कॉन्स्टेबल सुमित बाविस्कर, विजय धनगर, पोलीस कॉन्स्टेबल महेंद्र बागुल यांनी मंगळवारी २९ ऑक्टोबर रोजी सकाळी ७ वाजता कारवाई करत संशयित आरोपी समाधान माळी उर्फ वाघ याला अटक केली. त्याच्याकडून अडीच हजार रुपये किमतीची लोखंडी तलवार जप्त केली आहे. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल महेंद्र बागुल यांनी दिलेल्या फिर्यादीवरून धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.