पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | पाचोरा येथील महाराणा प्रताप चौकात जवळ जवळ पैट्रोल पंपासमोर असलेल्या बालाजी डोसा सेंटर वर गॅस गुरू करत असतांनाच गॅसचा अचानक स्फोट झाल्याने त्यात आई व मुलगा गंभीर भाजला गेला. त्यांना पाचोरा येथील खाजगी रुग्णालयात उपचार करण्यासाठी दाखल केले असता डॉक्टरांनी जळगाव येथे उपचारासाठी दाखल करण्याचा सल्ला दिला. गॅस सिलिंडर फुटल्यानंतर त्यांचा आवाज जवळपास अर्धा किलोमीटरवर पर्याय आल्याने परिसरातील नागरीकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले होते.
या स्फोटामुळे दुकानाची पत्रे व संपूर्ण सेट, टेबल खुर्च्या, भांडे साहित्य चक्का चुल झाल्याने दुकान मावकांचे सूमारे तीन ते चार लाखाचे नुकसान झाले आहे, याशिवाय आजेबाजूच्या तीन ते चार दुकानांचे मोठे नुकसान झाले आहे. मुळचे वेरूळी खुर्द तालुका पाचोरा येथील रहिवासी असलेले व गेल्या दिड वर्षांपासून पाचोरा येथील संघवी कॉलनीत राहुन इडली डोसाच्या व्यवसाय करुन उदर निर्वाह करीत असलेले ईश्वर संतोष पाटील (वय – ३२) व त्यांची आई लताबाई संतोष पाटील (वय – ५२) हे निर्णयाप्रमाणे सकाळी साडे सहा वाजता दूकानात आल्यानंतर साफसफाई केली व ७.२० लाख इडली व डोसा बनविण्यासाठी आईने गॅस सिलिंडर पेटविण्याचा प्रयत्न केला. यावेळी गॅस सिलिंडरचा मोठा स्पोट झाला त्या दौघही मोठ्या प्रमाणात भाजले गेले. स्फोटाचा आवाज अतिशय मोठा असल्याने परिसरातील नागरीकांनी धावत जाऊन त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल केले मात्र दोघांची तब्येत अत्तस्थ असल्याने त्यांना जळगाव येथे उपचारासाठी हलविण्यात आले. घटनास्थळी तात्काळ विज वितरण कंपनीचे कर्मचारी दाखल होवुन पुढील अनर्थ टळला आहे.