अमळनेरमध्ये काँग्रेसकडून डॉ. अनिल शिंदे यांना उमेदवारी

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | अमळनेर विधानसभा मतदारसंघ हा काँग्रेसला सुटला असून आज पक्षाने येथे उमेदवारी जाहीर केली आहे.

जिल्ह्यातील बहुतेक सर्व मतदारसंघातील लढतींचे चित्र स्पष्ट झाले असतांना अमळनेर विधानसभा मतदारसंघातून मात्र महाविकास आघाडीकडून कुणाला उमेदवारी मिळणार ? याबाबत मोठा संभ्रम निर्माण झाला होता. आधी ही जागा शरद पवार गटाला मिळणार असल्याची चर्चा होती. तर वाटाघाटींमध्ये हा मतदारसंघ काँग्रेस पक्षाला सुटल्याचे वृत्त आले तरी उमेदवार ठरला नव्हता.

या पार्श्वभूमिवर, आज काँग्रेस पक्षाच्या चौथ्या यादीत अमळनेर विधानसभा मतदारसंघातून डॉ. अनिल शिंदे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. येथून आधीच अजित पवार गटातर्फे मंत्री अनिल भाईदास पाटील तर माजी आमदार शिरीष चौधरी हे अपक्ष म्हणून रिंगणात उतरणार असल्याचे स्पष्ट झाले होते. आता काँग्रेसची उमेदवारी ही डॉ. अनिल शिंदे यांना जाहीर झाल्यामुळे येथे आता तिरंगी लढत होणार असल्याचे निश्चीत झाले आहे.

Protected Content