Home राजकीय मविआमध्ये बिघाडी; ‘हा’ मोठा पक्ष स्वबळावर लढणार

मविआमध्ये बिघाडी; ‘हा’ मोठा पक्ष स्वबळावर लढणार


मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | विधानसभा निवडणुकांसाठी महाविकास आघाडी व महायुतीमधील जागावाटपाचा घोळ अद्याप मिटलेला नाही. उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम मुदत २९ ऑक्टोबर रोजी संपत आहे, पण महाविकास आघाडी घटक – काँग्रेस, शिवसेना (ठाकरे गट) आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षांमधील १० ते १२ जागा वाटपावरून मतभेद टोकाला पोहोचले आहे. दरम्यान, अखिलेश यादव यांची सपाही आपले उमेदवार स्वतंत्रपणे उभे करण्याच्या तयारीत दिसत आहे.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या जागावाटपावर समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव खूश नसल्याचे बोलले जात आहे. सपाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अबू आझमी यांनी शनिवारी महाविकास आघाडी आघाडीकडे पक्षासाठी पाच जागांची मागणी केली होती. पण त्यांच्या बोलण्याला महाविकास आघाडीचे नेते कोणतेही ठोस उत्तर देत नाहीत. आझमी यांच्या मते, अखिलेश यादव यांच्या नाराजीचे हेच कारण असल्याचे बोलले जात आहे. सपाने मागणी केलेल्या पाच जागांपैकी ही एक जागा होती. आझमी यांच्या मते, यामुळे अखिलेश यादव नाराज झाले आहेत. महाविकास आघाडीने आमची विनंती मान्य केल्यानंतर आता राज्यात २० जागा लढवण्याचा पक्षाचा विचार आहे. या मतदारसंघात सेक्युलर मतांची विभागणी झाली तर त्याला महाविकास आघाडीचे बडे नेते जबाबदार असतील, असे ते म्हणाले.

धुळे शहर, मालेगाव मध्य, भिवंडी पूर्व, भिवंडी पश्चिम आणि मानखुर्द शिवाजीनगर या पाच जागांसाठी सपाने उमेदवारांना एबी फॉर्मचे वाटप केले आहे. आझमी स्वत: मानखुर्द शिवाजीनगरचे विद्यमान आमदार आहेत. रियास शेख हे भिवंडी पूर्वचे पक्षाचे आमदार आहेत. पाचही जागांवर अल्पसंख्याक मतदारांचे वर्चस्व आहे. अशा स्थितीत सपाला या जागा सहज जिंकता येतील, असे वाटते. सपाने मालेगाव मध्यमधून शान-ए-हिंद नेहाल अहमद आणि धुळ्यातून इरशाद जागीरदार यांना उमेदवारी दिली आहे. दोघांनीही एबी फॉर्म मिळाल्याची पुष्टी केली असून २९ ऑक्टोबरला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.


Protected Content

Play sound