मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । मुक्ताईनगर तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या ७ वर्षीय अल्पवयीन मुलीला चॉकलेटचे आमिष दाखवत तिच्यावर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भात मिळालेली माहिती अशी की, मुक्ताईनगर तालुक्यातील एका गावात ७ वर्षीय पीडित मुलगी ही आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहे. शुक्रवारी २५ ऑक्टोबर रोजी दुपारी ४.३० वाजता पीडित मुलगी ही घरी असताना संशयित आरोपी कार्तिक रवींद्र पाटील यांनी तिला चॉकलेटचे अभिषेक दाखवत जवळ बोलून तिच्यावर अत्याचार केला. दरम्यान ही घटना पीडित मुलीने आईला सांगितले. त्यानुसार पीडित मुलीचे आईने मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यानुसार शनिवारी २६ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री २ वाजता संशयित आरोपी कार्तिक रवींद्र पाटील यांच्या विरोधात मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नयन पाटील करीत आहे.