Home क्राईम धार्मिक अपशब्द वापरणाऱ्या तरुणांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी

धार्मिक अपशब्द वापरणाऱ्या तरुणांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी

0
44
WhatsApp Image 2019 07 07 at 3.57.40 PM
WhatsApp Image 2019 07 07 at 3.57.40 PM

WhatsApp Image 2019 07 07 at 3.57.40 PM

पाचोरा (प्रतिनिधी):  धार्मिक अपशब्द वापरणाऱ्या दोघा तरुणांवर गुन्हा दाखल करून प्रशासनाने कठोर कारवाई करावी यासाठी जय शंभू नारायण ग्रुप व वीर मराठा मावळा संघटना कडून पाचोरा पोलीस स्टेशन ला निवेदन देण्यात आले.

पाचोरा येथील दोन तरुणांनी धार्मिक अपशब्द असलेला व्हिडीओ तयार करून दोन धर्मामध्ये तेढ निर्माण करण्याचे काम केले आहे. यामुळे  धार्मिक भावना दुखावल्या असून त्या दोघा तरुणांवर गुन्हे दाखल करून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी  जय शंभू नारायण ग्रुप व वीर मराठा मावळा संघटना कडून निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.  निवेदनावर प्रशांत पाटील, गणेश शिंदे, शेखर पाटील, कमलेश सोनार, सचिन पाटील, बंटी पाटील आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.


Protected Content

Play sound