Home Cities पाचोरा पाचोऱ्यात जल्लोष : वैशालीताई सुर्यवंशी यांना शिवसेना-उबाठाचा एबी फॉर्म

पाचोऱ्यात जल्लोष : वैशालीताई सुर्यवंशी यांना शिवसेना-उबाठाचा एबी फॉर्म


पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पाचोरा येथील शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने वैशालीताई नरेंद्रसिंग सुर्यवंशी यांना एबी फॉर्म देण्यात आला आहे. त्यांना एबी फार्म मिळताच पाचोरा शहरातील त्यांचे समर्थक आणि कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष करत याचे स्वागत केले आहे. तसेच त्यांच्या उमेदवारीची अधिकृत घोषणा होणार आहे.

पाचोरा विधानसभा मतदारसंघातून शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने वैशालीताई नरेंद्रसिंग सुर्यवंशी यांची उमेदवारी ही आधीच मातोश्रीवरून जाहीर करण्यात आली होती. त्यानंत त्यांनी पाचोरा आणि भडगाव विधानसभा मतदारसंघात जनतेशी संवाद साधण्यास सुरूवात केली. अगदी मतदारसंघातील शेवटच्या घटकापर्यंत पोहचून परिवर्तनाचा नारा बुलंद केला असून मतदारांनी याला उत्स्फुर्त प्रतिसाद देखील दिला आहे. दरम्यान, शिवसेना-उबाठा पक्षाच्या वतीने उमेदवारीसाठी आवश्यक असणारा एबी फॉर्म हा वैशालीताई सुर्यवंशी यांना आज बुधवारी २३ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७ वाजता देण्यात आला आहे. याचे वृत्त येताच पाचोऱ्यात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.

दरम्यान, वैशालीताई सुर्यवंशी यांना एबी फॉर्म मिळाला असून पक्षाच्या पहिल्या यादीत त्यांचे नाव असल्याचे निश्चीत झाले आहे. तर दुसरीकडे त्या शुक्रवार २५ ऑक्टोबर रोजी शक्ती प्रदर्शन करत वैशालीताई सुर्यवंशी ह्या आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यासाठी युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यासह पक्षाच्या मान्यवर नेत्यांची उपस्थिती राहणार आहे. या रॅलीस शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्ष, युवासेना, महिला आघाडी, युवती आघाडी आणि अंगीकृत संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती राहणार आहे.


Protected Content

Play sound