मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणूक आता महिन्याभरापेक्षा कमी दिवसांवर येऊन ठेपली असताना आता माजी खासदार निलेश राणे यांनी आज मोठी घोषणा केली आहे. कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघासाठी निलेश राणे आता शिवसेना पक्षामध्ये प्रवेश करणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये उद्या निलेश राणे यांचा शिवसेनेत पक्ष प्रवेश होणार आहे. आज त्यांनी स्वतः पत्रकात परिषद घेत याची माहिती दिली आहे.
निलेश राणे हे नारायण राणे यांचे सुपुत्र आहे. कुडाळ मालवण मतदारसंघ शिवसेनेकडे असल्याने या मतदारसंघासाठी निलेश राणे हातात ‘धनुष्यबाण’ घेणार आहेत. कुडाळ हायस्कूल मैदानात उद्या निलेश राणेंच्या पक्षप्रवेशाचा कार्यक्रम होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. अद्याप एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून उमेदवार यादी जाहीर करण्यात आलेली नाही. दरम्यान आपण कुणाशी स्पर्धा करण्यासाठी नव्हे तर 21 व्या शतकाला शोभेल अशी कामगिरी मतदार संघात करायची असल्याने शिवसेनेत पक्ष प्रवेश करत असल्याचे निलेश राणे म्हणाले आहेत.