नवी मुंबईत भाजपला धक्का; माजी आमदारांनी फुंकली तुतारी

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईत भाजपला मोठा धक्का बसला आहे. भाजपकडून उमेदवारी न मिळाल्यामुळे संदीप नाईक यांनी भाजपचा राजीनामा देत शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे उपस्थित होते. त्यांच्यासोबत २५ माजी नगरसेवक आणि भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी देखील शरद पवार गटात प्रवेश केला. त्यामुळे बेलापूर विधानसभा मतदारसंघात भाजपच्या मंदा म्हात्रे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटात संदीप नाईक यांच्यात सामना होणार आहे.

नवी मुंबई महापालिकेत पाण्याचा प्रश्न आर आर पाटील यांच्या पुढाकाराने आमच्या नेतृत्वाने (गणेश नाईक) सोडवला. शरद पवार यांनी कशा प्रकारे विकास केला ते संदीप नाईक यांनी मांडले. आम्हाला जो सन्मान मिळाला पाहिजे होता तो सन्मान आम्हाला मिळाला नाही. २०२४ ला सन्मान मिळेल आणि कार्यकर्त्यांना न्याय मिळेल असे वाटले होते. २०२१ पासून आपल्या लोकांना पाण्याचा समस्येला सामोरं जावं लागलं. आपले पाणी दुसरीकडे वळवण्यात आले. जेव्हा जेव्हा अन्याय झाला त्यावेळी मी आवाज उठवला. पण काही जणांनी भूमिका घेतली नाही, असा टोला संदीप नाईक यांनी मंदा म्हात्रे यांना लगावला.

Protected Content