डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात युवतीच्या हृदयावरील छीद्रावर यशस्वी शस्त्रक्रिया

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | २९ वर्षीय युवतीच्या हृदयावरील छीद्रावर यशस्वी शस्रक्रिया करुन जीवनदान देणार्या डॉ. उल्हास पाटील रूग्णालयाच्या हदयरोग डॉक्टरांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. ह्रदयाच्या छिद्रावर शस्त्रक्रिया करणे अत्यंत कठीण काम असते, कारण अशावेळी त्यांच्या जीवाला जास्त धोका असतो, मात्र तरूणीसाठी डॉक्टरांनी देवदूतासारखी भूमिका निभावत ही किमया करून दाखवली आहे. २९ वर्षीय युवतीच्या हृदयावरील छीद्रावर यशस्वी शस्रक्रिया करुन जीवनदान देणार्या डॉ. उल्हास पाटील रूग्णालयाच्या कॉर्डिओलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. वैभव पाटील, डॉ. हार्दिक मोरे, डॉ.मोहीत, डॉ.निखील यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. युवतीच्या हृदयाला २२ मि.मि. चे छिद्र होते.

जळगावातील रहिवाशी या २९ वर्षीय युवतीला श्वास घेण्यास त्रास आणि धाप लागत असल्याचे निदर्शनास आले, त्यानंतर त्यांनी विविध ठीकाणी चाचण्या केल्या त्यावेळी या युवतीच्या हृदयाला २२ मि.मि. आकाराचे छिद्र असल्याचे निदर्शनास आले. त्यांनी डॉ.उल्हास पाटील वैद्यकिय रुग्णालयात डॉ हार्दिक मोरे यांचेशी संपर्क साधाला. त्यांनी युवतीला दाखल करण्यास सांगितले व ट्रान्सकॅथेटर प्रक्रिया राबवून ही यशस्वी शस्त्रक्रिया केली. शस्त्रक्रियेनंतर युवतीच्या प्रकृतीत सुधारणा होत असून युवतीच्या आहार आणि हदयप्रक्रिया व्यवस्थित होत असल्याचे दिसून आले आहे. डॉ.हार्दिक मोरे व डॉक्टर्सच्या टीमने अवघड शस्त्रकिया यशस्वी करुन युवतीला नवजीवन दिल्याबद्दल अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Protected Content